Tav Naynanche Dal Lyrics & Tabs by Salil Kulkarni

Tav Naynanche Dal

guitar chords lyrics

Salil Kulkarni

Album : SandhiprakashatPlayStop

तव नयनांचे दल हलले ग!
पानावरच्या दंवबिंदूपरी
त्रिभुवन हे डळमळले ग!

तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सूर कोसळले
ऋषि-मुनि-योगी चळले ग!
ऋतुचक्राचे आस उडाले
आभाळातुनि शब्द निघाले,
"आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले ग!"
हृदयी माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला भिडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरले ग!

नजर तुझी धरणीला भिडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरले ग!

Like us on Facebook.....
-> Loading Time :0.0143 sec