Ha Khel Sawalyanch Lyrics & Tabs by Hemant Kumar

Ha Khel Sawalyanch

guitar chords lyrics

Hemant Kumar

Album : Ha Khel Sawalyanch hindi PlayStop

रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्याचा
रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा

हा खेळ सावल्यांचा. हा खेळ सावल्यांचा
रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा.
हा चंद्र ना स्वयंभू रवीतेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
हा चंद्र ना स्वयंभू रवीतेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्यांचा
हा खेळ सावल्यांचा. हा खेळ सावल्यांचा
रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा

हा खेळ सावल्यांचा. हा खेळ सावल्यांचा
रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा.
आभास सावली हा असतो खरा प्रकाश
आभास सावली हा असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते, असती नितांत भास
हसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा.
या साजिर्या क्षणाला, का आसवें दिठीत
मिटतील सर्व शंका .
मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या या धुंद जीवनाचा
हा खेळ सावल्यांचा. हा खेळ सावल्यांचा.
रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा. हा खेळ सावल्यांचा.

Like us on Facebook.....
-> Loading Time :0.0101 sec